Ad will apear here
Next
‘राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाई गरजेची’
विद्यार्थी सहायक समितीच्या व्याख्यानमालेत पोपटराव पवार यांचे प्रतिपादन
व्याख्याते पोपटराव पवार यांचा सत्कार करताना मान्यवरपुणे : ‘स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरुणाई, मात्र अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. तरुणांनी हा विचार बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा. कारण राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाईची गरज असते,’ असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

गणिततज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती व उचित माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावर पवार यांनी मार्गदर्शन केले. समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे झालेल्या या व्याख्यानावेळी विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त व माजी पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी हरीश बुटले, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘हिवरेबाजारमध्ये कोणत्याही महापुरुषांचे पुतळे उभारले नाहीत, की जयंतीही आम्ही साजरी करत नाही; पण त्यांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणतो. वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. जमिनी खराब करून टाकल्या आहेत. यासाठी आता तरुणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोन हात करता येऊ शकतात. आजच्या तरुणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आले आहे. त्याचा उपयोग सकारात्मक कामासाठी करायला हवा.’

‘विद्यार्थ्यांनी पाण्याचा ताळेबंद शिकावा. पावसाचे पाणी अडवून ते जिरविण्याचा उपक्रम राबविला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद मांडल्यानेच हिवरेबाजारचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, असे सांगितले; मात्र सध्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे थांबवण्यासाठी तरुणांनी खेड्यातील उपलब्ध साधनांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा,’ असे आवाहनही पवार यांनी या प्रसंगी केले.

गिरीश कुलकर्णी याने सूत्रसंचालन केले. ऋतुजा धावडे हिने आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMQBV
Similar Posts
विद्यार्थी सहायक समितीतर्फे पोपटराव पवार यांचे व्याख्यान पुणे : विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व थोर गणितज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती आणि उचित माध्यम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथ्थक नृत्यातून उलगडले चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब पुणे : चित्रपटांतील गाणी, कविता शास्त्रीय नृत्यातून मांडत प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यातून चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब उलगडले. गणेश वंदना, कृष्णलीला, दुर्गेचे रूप यांच्या बहारदार सादरीकरणाने शर्वरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांचा कडकडाटात दाद मिळवली.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात वसतिगृह प्रवेश पुणे : येथे उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.
‘समितीमुळे आयुष्याला दिशा मिळाली’ पुणे : ‘गावाकडून पुण्यात आल्यानंतर शहराची ओळख झाली, शिक्षणाच्या विविध वाटा सापडत गेल्या. जगण्याला शिस्त लागली. जीवनातील शाश्वत मूल्ये अंगीकारता आली. विद्यार्थी सहायक समितीतून मिळालेल्या संस्कारामुळे आयुष्याला दिशा मिळाली,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि विद्यार्थी सहायक समितीचे माजी विद्यार्थी डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language